ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक आता मिळणार घरपोच

0
78

>> निर्णयाच्या अंमलबजावणीस झाला प्रारंभ

इ-प्रशासनाचा एक महत्वाचा भाग म्हणून राज्य वाहतूक खात्याने सर्व वाहन चालविण्याचे परवाने व आरसीबुक स्मार्ट कार्डच्या स्वरुपात टपालाद्वारे संबंधितांच्या घरापर्यंत पाठविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
वरील निर्णयामुळे लोकांना परवाने किंवा नोंदणी पुस्तिका घेण्यासाठी वाहतूक खात्याच्या कार्यालयामध्ये जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे कार्यालयात होणार्‍या गर्दीवरही नियंत्रण येऊ शकेल.
सरकारची सेवा जनतेच्या दारापर्यंत या संकल्पनेनुसारच खात्याने वरील पावले उचलली आहेत. टपालातून परवाने पाठविण्याच्या वेळी अर्जदाराला एसएमएसच्या माद्यमातून माहिती मिळू शकेल. शुल्क भरण्याची प्रक्रियाही ऑनलाईन पध्दतीने करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
वरील योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी खात्याचे संचालक निखिल देसाई यांच्या योगदानाचे वाहन चालक व संबंधितांनी स्वागत केले आहे.