>> पर्यटन व्यावसायिकाने दिली मंत्र्यांना माहिती
उत्तर गोव्यातील किनारपट्टी ड्रग व वेश्या व्यवसाय करणार्या माफियांच्या हातात कशी गेली आहे व काही राजकीय नेते व पोलीस अधिकारी यांचे त्यांच्याशी कसे साटेलोटे आहेत याची माहिती देणारे एक निनावी पत्र मच्छिमारी मंत्री विनोद पालयेकर यांना कळंगुट किनार्यावर पर्यटन व्यवसायात असलेल्या एका व्यक्तीने लिहिले आहे.
उत्तर गोव्यातील किनारपट्टी ड्रग माफियानी कशी काबीज केली आहे व या किनारपट्टीवर सध्या कोणकोणते भयानक प्रकार चालू आहेत त्याची माहिती या पत्रातून दिली आहे.
कळंगुट, बागा, हणजुण, वागातोर आदि किनार्यांवर ड्रग माफियांचा गेल्या काही वर्षांपासून नंगानाच चालू असून याच लोकांनी उत्तर गोव्यातील किनारपट्टीवर वेश्या व्यवसायही चालवला आहे. नेपाळ तसेच ईशान्येकडील राज्यातील गरीब युवतींना नोकर्या व कामधंद्याचे आमिष दाखवून गोव्यात आणून वेश्या व्यवसायात ढकलेले जाते व ज्या युवती वेश्या व्यवसाय करण्यास विरोध करतात त्यांना गुपचूप यमसदनीही पाठवले जात असल्याचे पत्रात म्हटले आहे.
पर्यटकांना लुटण्याचे प्रकार
ड्रग व वेश्या व्यवसायात असलेल्या माफियांच्या कळंगुट, बागा, हणजुण, वागातोर आदी किनार्यांवर टोळ्या असून ह्या टोळ्या वरील किनार्यांवर पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांच्या महागड्या वस्तू व पैसे चोरतात. या चोर्यांतून जी मिळकत होते त्याचा वाटा पोलीस अधिकार्यांना देण्यात येत असल्याने या चोरांच्या टोळीला पोलिसांकडून अभय मिळत असल्याचेही सदर पत्रात म्हटले आहे.