डॉ. सुरेश आमोणकरांचा आज ‘गोवा सुरक्षा मंच’ पक्षात प्रवेश

0
106

माजी आरोग्यमंत्री तथा भाजपचे साखळी मतदारसंघातील माजी आमदार डॉ. सुरेश आमोणकर आज भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या गोवा सुरक्षा मंच पक्षात आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी ४.३० वाजता त्यांच्या प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या नव्या राजकीय घडामोडीमुळे साखळी मतदारसंघात राजकीय रस्सीखेच वाढणार आहे.

डॉ. आमोणकर गोवा सुरक्षा मंचातर्फे साखळी मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहेत. भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरून भाजपशी फारकत घेतली होती. मध्यंतरी ते आम आदमीचे उमेदवार असतील अशी चर्चा होती. अखेर त्यांनी गोवा सुरक्षा मंच पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेऊन चर्चांना पूर्णविराम दिला आहे. डॉ. आमोणकर यांच्या प्रवेशामुळे भारतीय भाषा सुरक्षा मंचने साखळी मतदारसंघात आपली ताकद चाचपण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या मतदारसंघात भाजप, कॉंग्रेस, मगो, गोवा फॉरवर्ड, आप, अपक्ष उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचे रंगतदार लढत अपेक्षित आहे.