नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअरच्या नियामक मंडळावर गोव्यातील प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट डॉ. शेखर साळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश केंद्रीय मंडळाकडून जारी करण्यात आला आहे. हे मंडळ केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारित येणारे स्वायत्त मंडळ आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डॉ. साळकर यांचे सदर नियुक्तीबद्दल अभिनंदन केले आहे.