येत्या २०२२ मधील गोवा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठीचे भाजपतर्फे डॉ. प्रमोद सावंत हेच उमेदवार असतील असे काल भाजपचे राष्ट्रीच सचिव तथा गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनी स्पष्ट केले. गोवा दौर्यावर आलेल्या श्री. रवी यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेच येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करतील व पक्षाला विजय मिळवून देतील. याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. राज्यातील जनतेमध्ये सावंत यांची प्रतिमा चांगली असल्याचेही रवी यांनी यावेळी स्पष्ट केले.