डेंग्यूसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांबरोबर घेतला आढावा

0
110

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आरोग्य संचालनालयाच्या अधिकार्‍यांची खास बैठक घेऊन राज्यातील वाढत्या डेंग्यू तापाच्या प्रकरणाचा आढावा घेतला. डेंग्यूचा फैलाव रोखण्याच्या उपाय योजनांना गती देण्यासाठी नगरपालिका प्रशासन आणि पंचायत प्रशासनाशी समन्वय साधण्याची सूचना सावंत यांनी अधिकार्‍यांना केली.
राज्यातील विविध भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांत डेंग्यूबाबत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य खात्याने राज्यात आत्तापर्यंत तिघांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाय योजनावर चर्चा करण्यात आली.