पीएमसी ः १० हजार रू. काढण्याची ग्राहकांस मुभा

0
119

>> आरबीआयचा आदेश; संचालक मंडळ बरखास्त

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेतून आता खातेदारांना महिन्यातून दहा हजार रुपये काढण्याची मुभा भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जाहीर केली आहे. यामुळे खातेदारांना आता थोडासा दिलासा मिळणार आहे. याआधी या बँकेवर निर्बंध घालताना आरबीआयने खातेदारांना महिन्यातून केवळ एक हजार रुपये काढण्याची मुभा दिली होती. दरम्यान या बँकेच्या अनेक खातेदारांनी काल पोलिसांत सामुहिक तक्रार करून त्यात बँकेचे अध्यक्ष व संचालक यांनी जनतेचा पैसा लुटल्याचे म्हटले आहे.

तीन दिवसांपूर्वी आरबीआयने या बँकेच्या व्यवहारातील अनियमितता तथा गैरव्यवहारांमुळे बँकेच्या सर्व व्यवहारांवर निर्बंध घातले होते. तसेच बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनाही निलंबित केले होते. दरम्यान आरबीआयने बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून कामकाज पाहण्यासाठी प्रशाकांची नियुक्ती केली आहे.

आता आरबीआयने नव्याने आदेश काढला असून त्यानुसार या बँकेच्या खातेदारांना बचत किंवा करंट खात्यातून दहा हजार रुपये महिना काढता येतील. याआधीच कोणी एक हजार रुपये काढले असतील तर त्यालाही नव्या मर्यादेप्रमाणे पैसे काढता येणार आहेत.