डिचोली, साखळीत दोघांची आत्महत्या

0
106

सारमानस-डिचोली येथील भानुदास केशव आरोसकर (३४) या युवकाने शुक्रवारी संध्या ५.१५ वा. आपल्या राहत्या घरात नायलॉन दोरखंडाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच गुरुवारी साखळीतही विवाहीत महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती डिचोली पोलिस स्थानकातून देण्यात आली.सारमानस येथे आई व विवाहीत भाऊ, भावजय यांच्यासह राहणार्‍या भानुदास आरोसकर या अविवाहीत युवकाने घरातील आपल्या खोलीत छपराच्या वाश्याला नायलॉन दोरीने गळफास घेतला. सदर घटना शुक्रवारी (दि. १९ डिसें.) संध्या ५.१५ सुमारास घडली.
डिचोली पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक विठ्ठल माजीक व इतर पोलिसांनी घटनस्थळी भेट देऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे पाठविण्यात आला. तर उत्तरीय तपासणी अंती मृतदेह शनिवारी (दि. २०) नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्ये मागील कारण मात्र समजू शकले नाही. या प्रकरणी उपनिरीक्षक विठ्ठल माजीक अधिक तपास करीत आहेत.
साखळीतही गळफासाने आत्महत्या
गोकुळवाडी साखळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळ राहणार्‍या मूळ कर्नाटक येथील ताहीर मर्दाबाब अलीगिरी (३४) या विवाहीत महिलेने राहत्या घरात दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफासाने आत्महत्या केली. सदर घटना गुरुवार दि. १८ रोजी घडली.
गुरुवारी दुपारी महिलेचा मोठा मुलगा शाळेतून घरी आला तेव्हा ताहीरा ही आत गळफास घेऊन लटकत असल्याचे त्याने पाहिले व आरडाओरड केली.