डबल डेकर ट्रेनसाठी केंद्रीय मंत्र्यांकडे सावईकरांची मागणी

0
117

दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांनी काल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांची भेट घेऊन गोवा ते मुंबई दरम्यान डबल डेकर ट्रेन सुरू करण्याची मागणी केली. येत्या गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्‍वभूमीवर लवकर ही ट्रेन सुरू करण्यासठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन मंत्री सिन्हा यांनी सावईकर यांना दिले आहे. गोवा-मुंबई मार्गावरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन वरील ट्रेनसेवा कायम ठेवावी, अशीही मागणी सावईकर यांनी केली आहे.