टेलिमेडिसीन योजनेचा आजपासून शुभारंभ

0
31

गोवा सरकार टेलिमेडिसीन योजनेचा शुभारंभ आज १६ ऑक्टोबरपासून करणार आहे. या योजनेमुळे रुग्णांना गोवा वैद्यकीय महाविद्यालया तसेच राज्यातील जिल्हा इस्पितळातील डॉक्टरांकडून घरबसल्या टेलिफोनवरून वैद्यकीय सल्ला घेता येणार आहे. याला टेलिमेडिसीनबरोबरच टेलिहेल्थ अथवा ई-मेडिसीन असेही म्हणता येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

टेलिमेडिसीन योजनेमुळे रुग्णांना टेलिफोनद्वारे आपल्या आजाराची डॉक्टरांना माहती देता येईल. त्या आधारे डॉक्टर रोगाचे निदान करणार असून त्यांना उपचारही देणार आहेत. ही सेवा २ ऑक्टोबरपासून सुरू होणार होती. मात्र, तयारीच्या अभावामुळे ती पुढे ढकलावी लागली होती. आता ती आज दि.१६ पासून सुरू होत आहे.