टीम इंडियाची सुरुवात पराभवाने

0
236

>> ऑस्ट्रेलियाने ६६ धावांनी नमविले

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याची सुरुवात पराभवाने झाली. काल शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या वनडे मालिकेतील शुभारंभी लढतीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला ६६ धावांनी पराभूत केले. विस्फोटक शतकी खेळी केलेल्या स्टीव्ह स्मिथची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली.
ऑस्ट्रेलियाकडून मिळालेले ३७५ धावांचे आव्हान टीम इंडियाला पेलवले नाही व त्यांना ८ गड्यांच्या मोबदल्यात ३०८ धावांपर्यंतच मजल मारता आली. शिखर धवन व हार्दिक पंड्या यांनी शानदार अर्धशतके ठोकत विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. हार्दिकने ७ चौकार व ४ षट्‌कारांच्या सहाय्याने ७६ चेंडूत ९० तर धवनने आयपीएलमधील आपला फॉर्म कायम राखताना १० चौकारांच्या सहाय्याने ८६ चेंेंडूंत ७४ धावांची खेळी केली. कर्णधार विराट कोहली (२१), मयंक अगरवाल (२२), रवींद्र जडेजा (२५) व नवदीप सैनी नाबाद २९ धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू ऍडम झम्पाने ५४ धावांत ४, जोश हॅझलवूडने ३ र मिचेल स्टार्कने १ गडी बाद केला.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने सपाट खेळपट्टीमुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि कर्णधार आरॉन फिंच व स्टीव्ह स्मिथ यांच्या दमदार शतकांच्या जोरावर ६ गडी गमावत ३७४ अशी विशाल धावसंख्या उभारली. आपला १२६वा वनडे सामना खेळणार्‍या व सामनावीराचा मान मिळवलेल्या स्मिथने केवळ ६२ चेंडूंचा सामना करताना ११ चौकार व ४ षटकारांनिशी १०५ धावांची शतकी खेळी केली. त्याचे हे कारकिर्दीतले दहावे तर भारताविरोधातील चौथे शतक आहे. कर्णधार फिंचनेही तडफदार फलंदाजी करताना ९ चौकार व २ षटकारांच्या सहाय्याने १२४ चेंडूंत ११४ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. फिंचचे एकदविसीय कारकिर्दीतील १७ वे शतक शतक होय. युएईत झालेल्या आयपीएलमध्ये सफशेल अपयशी ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलने घरच्या मैदानावर पुन्हा लय मिळविताना १९ चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांनिशी ४५ धावा कुटल्या. भारताकडून मोहम्मद शमी सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५९ धावांत ३ तर जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी व युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

धावफलक
ऑस्ट्रेलिया ः डेव्हिड वॉर्नर झे. लोकेश राहुल गो. मोहम्मद शमी ६९, आरोन फिंच झे. लोकेश राहुल गो. जसप्रीत बुमराह ११४, स्टीव्ह फिंच त्रिफळाचित गो. मोहम्मद शमी १०५, मार्कुस स्टॉईनिस झे. लोकेश राहुल गो. युजवेंद्र चहल ०, ग्लेन मॅक्सवेल झे. रवींद्र जडेजा गो. मोहम्मद शमी ४५, मार्नुस लाबुछेन झे. शिखर धवन गो. नवदीप सैनी २, आलेक्स कॅरी नाबाद १७, पॅट कमिन्स नाबाद १ धाव.
अवांतर ः २१. एकूण ५० षटकांत ६ बाद ३७४ धावा.
गोलंदाजी ः मोहम्मद शमी १०/०/५९/३, जसप्रीत बुमराव १०/०/७३/१, नवदीप सैनी १०/०/८३/१, युजवेेंद्र चहल १०/०/८९/१, रवींद्र जडेजा १०/०/६३/१.
भारत ः मयंक अगरवाल झे. ग्लेन मॅक्सवेल गो. जोश हॅझलवूड २२, शिखर धवन झे. मिचेल स्टार्क गो. ऍडम झम्पा ७४, विराट कोहली झे. आरोन फिंच गो. जोश हॅझलवूड २१, श्रेयस अय्यर झे. आलेक्स कॅरी गो. जोश हॅझलवूड २, लोकेश राहुल झे. स्टीव्ह स्मिथ गो. ऍडम झम्पा १२, हार्दिक पंड्या झे. मिचेल स्टार्क गो. ऍडम झम्पा ९०, रवींद्र जडेजा झे. मिचेल स्टार्क गो. ऍडम झम्पा २५, नवदीप सैनी नाबाद २९, मोहम्मद शमी त्रिफळाचित मिचेल स्टार्क १३, जसप्रीत बुमराह नाबाद ०.
अवांतर ः २०. एकूण ५० षट्‌कांत ८ बाद ३०८ धावा.

गोलंदाजी ः मिचेल स्टार्क ९/०/६५/१, जोश हॅझलवूड १०/०/५५/३, पॅट कमिन्स ८/०/५२/०, ऍडम झम्पा १०/०/५४/४, मार्कुस स्टॉईनिस ६.२/०/२५/०, ग्लेन मॅक्सवेल ६.४/०/५५/०.