
दुसर्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा ६ गड्यांनी पराभव करत भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले २३१ धावांचे आव्हान भारताने ४६ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात गाठत मुंबईतील पराभवाचा वचपा काढला.
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या २३१ धावांचा पाठलाग करताना भारताने पहिला बळी २२ धावांवर रोहित शर्माच्या रुपात गमावला. रोहित शर्मा ङ्गक्त ७ धावा काढून बाद झाला. सलग दुसर्या सामन्यात त्याला अपयशाचा सामना करावा लागला.
त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवन यांच्या अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र कोहलीला पहिल्या सामन्यातील कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. वैयक्तिक २९ धावांवर त्याला ग्रँडहोम याने परतीचा रस्ता दाखवला, कोहलीनंतर धवन आणि कार्तिकने डाव सावरला. यादरम्यान धवनने आपले अर्धशतकही पूर्ण केले. अर्धशतकानंतर ६८ धावांवर तो बाद झाला. पाचव्या स्थानावर बढती मिळालेल्य पंड्याने झटपट ३० धावा जमवल्या. यानंतर कार्तिक आणि धोनीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. कार्तिकने ६४ तर धोनी १८ धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून साऊथी, मिल्ने, सेंटनर आणि ग्रँडहोमने प्रत्येकी एक बळी घेतला.
तत्पूर्वी, नाणेङ्गेक जिंकून प्रथम ङ्गलंदाजी घेतलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. भुवीने दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात बाद करत किवीजवर दबाव टाकला. आपल्या आऊटस्विंगने गप्टिल (११) याला झेलबाद केल्यानंतर भुवीने ‘नकल बॉल’ने मन्रो (२०) याची दांडी गुल केली. बुमराहचा इनस्विंगर बॅकफूटवर खेळण्याच्या नादात केन विल्यमसन केवळ ३ धावांवर पायचीत झाला. यावेळी त्यांची धावसंख्या ३ बाद २७ अशी दयनीय झाली होती. यानंतर रॉस टेलर २१ धावा करून पंड्याच्या गोलंदाजीवर धोनीकरवी झेलबाद झाला. पंड्याचा ‘बाऊन्सर’ पूल करण्याच्या नादात त्याला आपली विकेट गमवावी लागली. पहिल्या सामन्यात ‘स्वीप’चा फटका खेळून भारतीय गोलंदाजांना नामोहरम केलेल्या लेथम याला याच फटक्याने दगा दिला. अक्षर पटेल ‘अराऊंड द विकेट’ गोलंदाजी करत असताना मधल्या यष्टीच्या रेषेत टप्पा पडलेला चेंडू स्वीप मारण्याच्या प्रयत्नात त्याला आपली यष्टी गमवावी लागली. निम्मा संघ ११८ धावांमध्ये माघारी परतल्यानंतर निकोल्स आणि ग्रँडहोमने अनुक्रमे ४२ व ४१ धावा ङ्गटकावत संघाचा डाव सावरला. हे दोघेही बाद झाल्यानंतर सेंटनरने २९ आणि साऊथीने नाबाद २५ धावा करत संघाचा डाव २३० पर्यंत पोहोचवला. भारताकडून वेगवान गोलंदाज भुवनेश्वरने ३, बुमराह आणि चहलने प्रत्येकी २ बळी घेतले. तर, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलला एक बळी मिळाला.
धावफलक
न्यूझीलंड ः मार्टिन गप्टिल झे. धोनी गो. भुवनेश्वर ११, कॉलिन मन्रो त्रि. गो. भुवनेश्वर १०, केन विल्यमसन पायचीत गो. बुमराह ३, रॉस टेलर झे. धोनी गो. पंड्या २१, टॉम लेथम त्रि. गो. पटेल ३८, हेन्री निकोल्स त्रि. गो. भुवनेश्वर ४२, कॉलिन डी ग्रँडहोम झे. बुमराह गो. चहल ४१, मिचेल सेंटनर झे. कोहली गो. बुमराह २९, ऍडम मिल्ने पायचीत गो. चहल ०, टिम साऊथी नाबाद २५, ट्रेंट बोल्ट नाबाद २, अवांतर ८, एकूण ५० षटकांत ९ बाद २३०
गोलंदाजी ः भुवनेश्वर कुमार १०-०-४५-३, जसप्रीत बुमराह १०-२-३८-२, केदार जाधव ८-०-३१-०, हार्दिक पंड्या ४-०-२३-१, अक्षर पटेल १०-१-५४-१, युजवेंद्र चहल ८-१-३६-२
भारत ः रोहित शर्मा झे. मन्रो गो. साऊथी ७, शिखर धवन झे. टेलर गो. मिल्ने ६८, विराट कोहली झे. लेथम गो. ग्रँडहोम २९, दिनेश कार्तिक नाबाद ६४, हार्दिक पंड्या झे. मिल्ने गो. सेंटनर ३०, महेंद्रसिंग धोनी नाबाद १८, अवांतर १६, एकूण ४६ षटकांत ४ बाद २३२
गोलंदाजी ः टिम साऊथी ९-१-६०-१, ट्रेंट बोल्ट १०-०-५४-०, ऍडम मिल्ने ८-१-२१-१, मिचेल सेंटनर १०-०-३८-१, कॉलिन डी ग्रँडहोम ७-०-४०-१, कॉलिन मन्रो २-०-१२-०