झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा आज रांचीत शपथविधी

0
115

भाजपचे ज्येष्ठ नेते रघुवर दास आज झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दास यांच्या रूपाने राज्याला प्रथमच बिगर आदिवासी मुख्यमंत्री लाभला आहे. रांचीमधील बिरसा मुंडा ङ्गुटबॉल स्टेडियमवर शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. दास यांच्या शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहाणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आणि प्रशासनाने त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेसाठी ८०० पोलिस अधिकार्‍यांना तैनात करण्यात येणार आहे. दरम्यान, दास यांच्या नियुक्तीला आदिवासी संघटनांनी विरोध दर्शवला असल्याने शपथविधी कार्यक्रमाला नक्षली हल्ला होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत.