ज्येष्ठ सिने अभ्यासक इसाक मुजावर निवर्तले

0
100

प्रदीर्घ काल सिने जगतातील विविध घडामोडीवर सातत्यपूर्ण लेखन केलेले ज्येष्ठ सिने अभ्यासक, पत्रकार इसाक मुजावर यांचे काल येथे वृध्दापकाळाने निधन झाले. मूळ कोल्हापूर येथील मुजावर एका सिने साप्ताहिकात काम करत होते. १९५८च्या सुमारास त्या काळातील आघाडीचे सिने साप्ताहिक ‘रसरंग’चे कार्यकारी संपादकपद मिळाले. ‘एका सोंगाड्याची बतावणी’, माऊली, मीना कुमारी, मुखवटा अशा पुस्तकांसह त्यांनी मराठी सिनेमाचा इतिहास हे ८०० पानी पुस्तकही लिहिले आहे.