‘उमराव जान’, ‘कभी-कभी’ यांसारख्या चित्रपटांमधून अजरामर संगीताची अमूल्य भेट श्रोत्यांना देणारे ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे काल रात्री साडेनऊ वाजता मुंबईतील सुजय रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांनी वयाच्या ९०व्या वर्षी १० कोटींची संपूर्ण संपत्ती दान केली होती. खय्याम यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वातील एक अनमोल हिरा काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्यावर आज चार बंगला येथील कब्रस्तानात दङ्गनविधी करण्यात येणार आहे.
खय्याम यांनी वयाच्या १७व्या वर्षी पंजाबमधील लुधियाना शहरातून संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. ‘कभी-कभी’ (१९७२) आणि उमराव जान (१९८१) या चित्रपटांमधील अविस्मरणीय संगीताने त्यांना नव्या उंचीवर नेऊन ठेवले. नूरी, रझिया सुलतान, बाजार यांसारखे चित्रपट खय्याम यांच्या संगीताने अजरामर झाले. कभी कभी मेरे दिल में, दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए, मै पल दोन पल का शायर हूँ, इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारों है ही त्यांची काही गाजलेली गाणी. पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. २०१० मध्ये त्यांना संगीतक्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘ङ्गिल्मङ्गेअर जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात आला होता.