जोकोविच, हालेपची घोडदौड

0
188

>> माजी विजेता स्टॅन वावरिंका गारद

सर्बियाच्या अव्वल मानांकित नोवाक जोकोविच याने चार सेटपर्यंत चाललेल्या संघर्षपूर्ण लढतीत अमेरिकेच्या फ्रान्सिस तियाफो याचा कडवा प्रतिकार ६-३, ६-७ (७), ७-६ (२), ६-३ असा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. महिला एकेरीत द्वितीय मानांकित सिमोना हालेप हिलादेखील विजयासाठी बराच घाम गाळावा लागला. पहिला सेट ४-६ असा गमावल्यानंतर हालेपने पुढील दोन्ही सेट ६-४, ७-५ असे जिंकत ऑस्ट्रेलियाच्या ऍना टोमलानोविच हिचा पराभव केला. ऑस्ट्रियाच्या तृतीय मानांकित डॉमनिक थिम व जर्मनीच्या सहाव्या मानांकित आलेक्झांडर झ्वेरेव यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना दयामाया दाखवली नाही. थिमने जर्मनीच्या कोपर याचा ६-४, ६-०, ६-२ असा पराभव करत तिसर्‍या फेरीत दिमाखात प्रवेश केला. झ्वेरेवने पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या अमेरिकेच्या मॅक्सिम क्रेसी याला ७-५, ६-४, ६-३ अशी धूळ चारली.

महिला एकेरीत अमेरिकेच्या दहाव्या मानांकित सेरेना विल्यम्सने आपला झंझावात सुरूच ठेवला. दुसर्‍या फेरीत तिने सर्बियाच्या निना स्टोआनोविच हिचा ६-३, ६-० असा पराभव केला. जपानच्या तृतीय मानांकित नाओमी ओसाका हिनेदेखील दुसर्‍या फेरीचा अडथळ सहज पार करत फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सिया हिला ६-२, ६-३ असे अस्मान दाखवले.

भारताचा रोहन बोपण्णा व त्याचा जपानचा सहकारी बेन मॅकलेचलान यांना मात्र पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. दक्षिण कोरियाच्या जी सुंग नाम व मिन क्यू सॉंग या वाईल्ड कार्डधारी जोडीने इंडो-जपानीच जोडीला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.
अन्य महत्त्वाचे निकाल ः दुसरी फेरी – पुरुष एकेरी ः ग्रिगोर दिमित्रोव (१८) वि. वि. आलेक्स बोल्ट ७-६, ६-१, ६-२, स्टॅन वावरिंका (१५) पराभूत वि. मार्टन फुसकोविच ५-७, १-६, ६-४, ६-४, ६-७ (११), युगो हंबर्ट (२९) पराभूत वि. निक किर्गियोस ७-५, ४-६, ६-७ (७), ४-६, डॅनिश श्‍वार्टझमन (८) वि. वि. आंद्रे मुल्लर ६-२, ६-०, ६-३, डॅनिस शापोवालोव (११) वि. वि. बर्नार्ड टॉमिक ६-१, ६-३, ६-२.
महिला एकेरी ः अनास्तासिया सबालेंका (७) वि. वि. दारिया कसातकिना ७-६, ६-३, पेट्रा क्विटोवा (९) पराभूत वि. सोराना सर्स्टिया ४-६, ६-१, १-६, इगा श्‍विओंटेक (१५) वि. वि. कामिला जॉर्जी ६-२, ६-४, मार्केटा वोंदरुसोवा (१९) वि. वि. रेबेका मरिनो ६-१, ७-५, गार्बिन मुगुरुझा (१४) वि. वि. ल्युडमिला सामसोनोवा ६-३, ६-१