जोकोविच, मेदवेदेवची विजयी सलामी

0
97

>> सुमीत नागलने फेडररला झुंजवले

युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अव्वल मानांकित नोवाक जोकोविच याने स्पेनच्या रॉबर्टो कार्बेलास बाएना याचा ६-४, ६-१, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करत दुसरी फेरी गाठली. भारताच्या सुमीत नागल याच्याविरुद्ध पहिला सेट गमवावा लागल्यानंतर तृतीय मानांकित रॉजर फेडरर याने स्वतःला सावरत सामना ४-६, ६-१, ६-२, ६-४ असा जिंकत आगेकूच केली. विजयानंतर फेडरर याने सुमीतचे कौतुक केले. टेनिसमध्ये सातत्याला महत्व आहे. त्याने कालच्या सामन्यात आप्रतिम खेळ करून दाखवला. टेनिसमधील त्याचे भविष्य उज्वल आहे, असे फेडररने सांगितले. भारताच्या प्रज्ञेश गुणेश्‍वरन याला पाचव्या मानांकित डॅनिस मेदवेदेव याने ६-४, ६-१, ६-२ असे पराजित केले. इटलीच्या अकराव्या मानांकित फाबियो फॉनिनी याला मात्र पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला.

अमेरिकेच्या बिगरमानांकित रेली ओपलका याने त्याचा ६-३, ६-४, ६-७, ६-३ असा दोन तास ५१ मिनिटांत पराभव केला. अमेरिकेच्या २६व्या मानांकित याला स्पेनच्या बिगरमानांकित फेलिसियानो लोपेझ याने ३-६, ६-४, ६-३, ६-४ असे नमवून स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. अर्जेंटिनाच्या १९व्या मानांकित गिडो पेला यालादेखील धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. पाब्लो कारेनो बुस्टा याने पेला याला ६-३, ४-६, ७-६, ६-३ असा धक्का दिला. महिला एकेरीत द्वितीय मानांकित ऍश्‍ले बार्टीने कझाकस्तानच्या झरिना दियासविरुद्धचा पहिला सेट १-६ असा एकतर्फी गमावल्यानंतर पुढील दोन्ही सेट ६-३, ६-२ असे जिंकत संभाव्य पराभव टाळला. आठव्या मानांकित सेरेना विल्यम्ससमोर रशियन टेनिससुंदरी मारिया शारापोवाची डाळ शिजली नाही. सेरेनाने केवळ ५९ मिनिटांत शारापोवाचा ६-१, ६-१ असा खुर्दा उडविला.

अन्य महत्त्वाचे निकाल ः पहिली फेरी ः महिला एकेरी ः मॅडीसन कीज (१०) वि. वि. मिसाकी दोई ७-५, ६-०, अँजेलिक कर्बर (१४) पराभूत वि. क्रिस्टिना म्लादेनोविच ५-७, ६-०, ४-६, सोफिया केनिन (२०) वि. वि. कोको वांदेवेघे ७-६, ६-३, इलिना स्वितोलिना (५) वि. वि. व्हाईटनी ओसुगवे ६-१, ७-५, पेट्रा क्विटोवा (६) वि. वि. डॅनिसा अलिर्टोवा ६-२, ६-४, गार्बिन मुगुरुझा (२४) पराभूत वि. ऍलिसन रिस्के ६-२, १-६, ३-६, किकी बर्टेन्स (७) वि. वि. पावला बादोसा ६-४, ६-२
पुरुष एकेरी ः स्टॅन वावरिंका (२३) वि. वि. जॉन सिनर ६-३, ७-६, ४-६, ६-३, डेव्हिड गॉफिन (१५) वि. वि. कॉरेंटिन मोटेट ६-३, ३-६, ६-४, ६-०, निकोलस बासिलाश्‍विली (१७) वि. वि. मार्टन फुकसोविच ३-६, ६-४, ६-२, ३-६, ६-३