>>करियर स्लॅम पूर्ण
जागतिक नंबर एक खेळाडू नोव्हाक जोकोविकने पहिला सेट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करताना ब्रिटेनच्या अँडी मरेला पराभूत करीत पहिल्यांदाच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद प्राप्त केले.
या जेतेपदाबरोबरच त्याने आपले करियर स्लॅम पूर्ण करीत सलग चारही ग्रँड स्लॅम किताबे मिळविणारा टेनिस जगतातील तिसरा खेळाडू बनला. यापूर्वी डॉन बज (१९३८) आणि रोड लेव्हर (१९६२ आणि १९६९) यांनाच अशी कामगिरी नोेंदविता आलेली आहे.
अव्वल मानांकित जोकोविकने मरेचे आव्हान ३-६, ६-१, ६-२, ६-४ असे चार सेटमध्ये मोडीत काढत कारकिर्दीतील आपले १२ ग्रँडस्लॅम मिळविले.
ग्रँड स्लॅम अंतिम फेरीतील जोकोविक आणि मरे यांच्यातील ही सातवी लढत होती आणि सर्बियन खेळाडूने पाचव्यांदा बाजी मारली. ग्रँड स्लॅममधील या दोघांमधील १०व्या लढतीत जोकोविकने आठ वेळा मरेवर विजय मिळविलेला आहे. तर एकूण लढतीत जोकोविकने २४ तर मरेने १० वेळा विजय मिळविलेला आहे.
फ्रेड पॅरी (१९३५) नंतर फ्रेंच ओपनचे जेतेपद मिळविणार पहिला ब्रिटिश खेळाडू बनण्याची संधी मरेला होती. परंतु त्याला उपविजेतेपदावर समाधानी व्हावे लागले. १९३७मध्ये बनी ऑस्टिनने उपविजेतेपद प्राप्त केले होते.
जोकोविकचे हे ११वे ग्रँड स्लॅम जेतेपद होय. यापूर्वी त्याने जोकोविच सहा वेळा ऑस्ट्रेलिया ओपन (२००८, २०११, २०१२, २०१३, २०१५ व २०१६), तीन विम्बल्डन (२०११, २०१४, २०१५) आणि दोन अमेरिकन ओपन (२०११ व २०१५) जेतेपदे मिळविलेली आहेत. यापूर्वी आंद्रे आगासी, बज, रॉय एमरसन, रोजर ङ्गेडरर, लेवर, राङ्गेल नदाल आणि ङ्ग्रॅड पॅरी यांनी करियम स्लॅम पूर्ण केलेला आहे. तर कॅलेंडर ग्रँड स्लॅम बज (१९३८) आणि लेवर (१९६२ ल १९६९) यांनाच पूर्ण करता आलेला आहे.
यजमान फ्रांसला ४५ वर्षानंतर
प्रथमच महिला दुहेरीचे जेतेपद
कॅरोलिन गार्सिया आणि क्रिस्टिना म्लाडेनोविक या फ्रांसिसी जोडीने रशियाच्या इकाटेरिना मॅकारोव्हा व इलेना वेस्निना यांचा अंतिम लढतीत पराभव करीत फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद पटकाविले. या विजयाबरोबरच कॅरिलिना-क्रिस्टिना यांनी फ्रांसला ४५ वर्षानंतर प्रथमच फ्रेंच ओपन महिला दुहेरीचे जेतेपद मिळवून मान पटकाविला. कॅरिलिना-क्रिस्टिना यांचे हे तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद होय. अंतिम लढतीत कॅरिलिना-क्रिस्टिना यांनी २०१३ नंतर प्रथमच मोठ्या स्पर्धेची गाठताना इकाटेरिना-इलेना यांचा ६-३, २-६, ६-४ असा तीन सेटमध्ये पराभव केला. यापूर्वी गाइल शेरिफ चांफ्रेउ लोवेरा आणि फ्रांकॉयसे डर यांनी १९७१मध्ये फ्रांसला शेवटचे फ्रेंच ओपन जेतेपद मिळवून दिले होते.
फेलिसियानो-लोपेझ यांना पुरुष दुहेरीचे जेतेपद
दरम्यान, पुरुष दुहेरीत स्पेनच्या फेलिसियाने व मार्क लोपेझ यांनी अमेरिकेच्या मायक व ब्रायन बंधुंवर मात करीत अजिंक्यपद पटकाविले.