अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत जॉर्जियामध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागणीवरून काल फेरमोजणी घेण्यात आली. त्यात पुन्हा ज्यो बायडन हे विजयी झाले असून ट्रम्प यांना धक्का बसला आहे. निवडणुकीच्या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत ट्रम्प यांनी फेरमेजणीच मागणी केली होती. या अगोदर झालेल्या मोजणीत बायडन हे विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र त्यावर ट्रम्प यांनी आक्षेप घेतला होता. फेरमतमोजणीत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाला नसल्याचे समोर आले असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
विस्कॉन्सिनमध्ये पुन्हा मतमोजणी
अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरूच ठेवत विस्कॉन्सिन येथील दोन ठिकाणी पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी ट्रम्प यांनी केली आहे. या ठिकाणी पुन्हा मतमोजणीसाठी आवश्यक असलेली ३० लाख अमेरिकी डॉलरची रक्कमही त्यांनी भरली आहे.