जैश उल हिंदने घेतली ‘त्या’कारची जबाबदारी

0
180

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर तीन दिवसांपूर्वी सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारची जबाबदारी जैश-उल-हिंद या संघटनेने घेतली आहे. ही नवीनच संघटना आहे. या संदर्भात संघटनेने हा फक्त एक ट्रेलर होता. अजून मोठे चित्र समोर यायचे आहे असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी तपास यंत्रणांनाही तुम्हाला जमत असेल तर आम्हाला थांबवून दाखवा असे आव्हान दिले आहे. या कारमध्ये जिलेटिन कांड्या होत्या. स्फोटके सापडल्यानंतर परिसरात पोलीस तैनात केले आहेत