जेएनयू : कन्हैयाला दहा हजारांचा दंड

0
75

>>उमर, अनिर्बान, सौरभवरही कारवाई

जेएनयूतील कथित देशविरोधी घोषणांप्रकरणी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला सखोल चौकशीअंती विद्यापीठाने दहा हजारांचा दंड ठोठावला असून त्याचा सहकारी उमर खालीद याला एका शैक्षणिक सत्रासाठी विद्यापीठातून निलंबित केले आहे. शिस्तभंग केल्याप्रकरणी विद्यापीठाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सौरभ शर्मा यालाही १० हजारांचा दंड ठोठावला आहे.
जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अनिर्बान भट्टाचार्य याच्यावरही विद्यापीठाने कारवाई केली आहे. अनिर्बान याला १५ जुलैपर्यंत विद्यापीठातून निलंबित करण्यात आले
आहे.
याच संघटनेचा माजी अध्यक्ष आशुतोष कुमार यालाही विद्यापीठाने सजा केली आहे. त्याला २० हजार रुपयांचा दंड तसेच वर्षभरासाठी वसतिगृहातून हकालपट्टी करण्यात आली आहे.