अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेशासाठी होणार्या अनुक्रमे जेईई व नीट या केंद्रीय प्रवेश परीक्षा ठरल्यानुसार घेतल्या जातील अशी ग्वाही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी काल दिली. काही बिगर भाजप राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची वरील भूमिका श्री. पोखरियाल यांनी मांडली. परीक्षा केंद्रात सर्वतोपरी खबरदारी घेतली जाईल असे ते म्हणाले.