गोवा क्रिकेट असोसिएशनच्या काल झालेल्या खास सर्वसाधारण सभेत ‘तिकीट घोटाळा’ प्रकरणा नाव असलेले विनोद फडके यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जीसीएच्या आठ सदस्यांनी केली. तथापि, फडके यांनी राजीनामा देण्यास नकार दर्शविला.
जीसीएच्या संलग्न क्लबांनी आपली अध्यक्षपदी नियुक्ती केलेली असून आपला राजीनामा मागण्याचा अधिकार त्यांनाच आहे. अध्यक्षपदाच्या खुर्चीवर डोळा असलेल्यांच्या मागणीमुळे आपण पायउतार होणार नाही. आपण कायदेशीर सल्ला घेणार असून गजर पडल्यास आमसभा बोलावली जाईल, असेही फडके यांनी सांगितले. डॉ साळकर पहिल्या दिवसापासून आपल्या खुर्चीवर डोळा ठेवून आहेत, असा आरोपही विनोद ङ्गडके यांनी केला. २००१ साली फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियामधील एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातील ‘तिकीट घोटाळा’ प्रकरणात जीसीएचे विद्यमान अध्यक्ष ङ्गडके यांचे नाव असल्याचा ठपका पेंडसे आयोगाने ठेवल्याने गोवा क्रीडा प्राधिकारणाने जीसीएवर कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. ‘साग’च्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी आपण पंधरा दिवसांची मुदत मागितलेली आहे, असेही फडके यांनी सांगितले.
गोव्याच्या क्रिकेटच्या हितासाठी आपण कटिबध्द आहे आणि सरकारकडूनही आपल्याला पूर्ण पाठिंबा आहे, असे सांगून नव्या क्रिकेट स्टेडियमचे सोपस्कार आपण पूर्ण करणार तसेच पणजी जिमखाना आणि एमसीसी मैदानाच्या नूतनीकरणासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची पुस्ती त्यांनी जोडली. जीसीएमधील मतभेद उघड झालेले असले तरी त्याचा परिणाम क्रिकेटवर होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.
जीसीएचे उपाध्यक्ष डॉ साळकर यांच्या गटातील आठ कार्यकारिणी सदस्यांनी फडके यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून ङ्गडके यांच्या बाजूने सात कार्यकारिणी सदस्य आहेत. दोन तृतीयांश बहुमताने राजीनामाच्या मागणी झालेली असल्याने विनोद ङ्गडके यांचे अध्यक्षपद अवैध ठरले आहे. आपण आपल्या निर्णयाशी ठाम असून असून फडके यांना यापुढे कोणताच अधिकृत निर्णय घेता येणार नाही असे ठरले आहे, असे डॉ साळकर यांनी सांगितले.
यावेळी डॉ साळकर यांच्या गटातील उपाध्यक्ष संजय काणेकर, खजिनदार विलास देसाई, अमरेश नाईक, सर्वेश नाईक, सुदिन कामत, प्रभूज्योत संधू, सुदेश प्रभूदेसाई हे सदस्य उपस्थित होते.