जीसीईटीचा निकाल जाहीर

0
12

गोवा सरकारच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने गोवा समान प्रवेश परीक्षा (जीसीईटी) 2023 चा निकाल काल जाहीर केला. जीसीईटी ही गोव्यातील अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी ही पात्रता परीक्षा अनिवार्य आहे. रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रासाठी एकूण 3,224 उमेदवारांनी नोंदणी केली, तर 2,476 उमेदवारांनी गणितासाठी नोंदणी केली. गेल्या 13 आणि 14 मे रोजी परीक्षा घेण्यात आल्या.
भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेसाठी 3089 विद्यार्थी बसले होते आणि त्यांना सरासरी 22.68 गुण मिळाले. रसायनशास्त्र विषयाच्या परीक्षेसाठी एकूण 3088 विद्यार्थी बसले होते आणि सरासरी 27.97 गुण मिळाले. गणित विषयाच्या परीक्षेसाठी 2476 पैकी 2373 विद्यार्थी बसले आणि त्यांना सरासरी 27.77 गुण मिळाले.
जीसीईटी 2023 मध्ये भौतिकशास्त्रात आदिप कुंकळ्येकर, रसायनशास्त्रात अथर्व नाईक, गणितात हेमांशी देसाई यांना पहिला क्रमांक मिळाला. व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 19 मेपासून सुरू होणार आहे.
दरम्यान, गोव्यातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया पुढील वर्षीपासून जेईईच्या आधारे होणार आहेत.