केंद्र सरकारकडून राज्य सरकारला जीएसटी नुकसान भरपाईपोटी ११९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. केंद्र सरकारने विविध राज्यांना जीएसटी नुकसान भरपाईपोटी २० हजार कोटींचे वितरण केले आहे. त्यात गोवा सरकारला ११९ कोटी रुपये प्राप्त झाले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या सरकारला या निधीमुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे.