आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत मगो पक्ष सत्ताधारी भाजपबरोबर युती करणार आहे, अशी माहिती काल मगो पक्षाचे नेते व वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. त्यासाठी भाजप व मगो पक्षाची लवकरच एक बैठक होणार असून या बैठकीत पुढील रणनिती ठरवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्षम असे नेतृत्त्व निर्माण करणे, ग्रामीण भागांचा विकास करणे आणि जनतेचे प्रश्न प्रभावीपणे सोडवणे हा भाजप-मगो युतीचा मुख्य उद्देश असेल, असे ढवळीकर यांनी नमूद केले.
जिल्हा पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग येऊ लागलेला असून, भाजप-मगो युती पुन्हा सक्रिय झाली असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.