जिल्हा पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षांना वेतनवाढ

0
10

राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत जिल्हा पंचायतींचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांच्या वेतनात दोन हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता दिली. या संदर्भातील विधेयक चालू विधानसभा अधिवेशनात सादर केले जाणार आहे. जिल्हा पंचायत सदस्यांच्या वेतनवाढीमुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक अतिरिक्त 12 लाख रुपयांचा भार पडणार आहे. दोन्ही जिल्हा पंचायतींचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या मूळ वेतनात मानधन आणि भत्त्यापोटी प्रत्येकी एक हजार रुपयांची वाढ केली जाणार आहे. याआधी अध्यक्षांना मूळ वेतन 9 हजार व 9 हजार रुपये भत्ता असे मिळून 18 हजार रुपये वेतन मिळत होते. त्यांना यापुढे 20 हजार रुपये वेतन मिळेल. उपाध्यक्षांना मूळ वेतन 9 हजार व 7,500 रुपये भत्ता मिळून, 16,500 रुपये मिळत होते. त्यांना यापुढे 18,500 रुपये वेतन मिळेल. सदस्यांना 9 हजार मूळ वेतन व 6 हजार रुपये भत्ता मिळून 15 हजार रुपये वेतन मिळत होते. त्यांना यापुढे 17 हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे.