नुकत्याच फ्रेंच ओपन सुपर सीरिज स्पर्धेत अजिंक्यपद मिळविलेल्या भारताचा नवा सुपरस्टार शटलर किदम्बी श्रीकांतने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत दुसर्या स्थानावर झेप घेतली आहे. श्रीकांतचे ७३,४०३ गुण झाले आहेत. व्हिक्टर ऍक्सेलसेन ७७,९३० गुणांसह अव्वल स्थानी आहे.
या वर्षी खेळलेल्या ४० लढतींपैकी श्रीकांतने ३२मध्ये विजय मिळविलेला असून ८ सामन्यांत त्याला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दोन आठवड्यांच्या कालावधीत श्रीकांतने जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावरुन दुसर्या स्थानावर झेप घेतली आहे. यापूर्वी श्रीकांतने २०१५ साली तिसर्या स्थानापर्यंत मजल मारली होती. २०१७मध्ये श्रीकांतने इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि फ्रेंच अशा चार सुपर सीरिज स्पर्धा जिंकलेल्या आहेत. तर सिंगापूर ओपनमध्ये त्याला उपविजेतेपदावर समाधाना मानावे लागले होते.
दरम्यान, अन्य एक भारतीय स्टार बॅडमिंटनपटू साई प्रणीतला मात्र फटका बसला असून तो १६ व्या स्थानी घसरला आहे. अजय जयराम २२व्या स्थानी पोहोचला आहे. तर. समीर आणि सौरभ वर्मा हे दोघे १८ आणि ४१ या स्थानावर कायम राहिले आहेत. परुपल्ली कश्यप ४५व्या स्थानी पोहोचला आहे.
दरम्यान, महिलांच्या एकेरीत पीव्ही सिंधू (८२,४८६) आणि सायना नेहवाल (,६९० गुण) अनुक्रमे दुसर्या व अकराव्या स्थानी कायम आहेत.
पुरुष दुहेरीत सत्विकसाईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी २८व्या तर मनु अत्री आणि बी. सुमित रेड्डी ३३व्या स्थानी पोहोचले.
महिला दुहेरीत आश्विनी पोनाप्पा आणि एन. सिकी रेड्डी यांनी २५वे स्थान मिळवले आहे. र्ी७