जलस्रोत मंत्र्यांच्या भेटीमुळे मडगावातील कर्मचार्‍यांची भंबेरी

0
108

जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी काल मडगाव येथील फातोर्डा व रावणफोंड येथील कार्यालयात अचानक भेट देऊन पहाणी केली असता कित्येक कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले. त्याबद्दल त्यांनी कार्यालय प्रमुखांना धारेवर धरले.
काल सकाळी दोन्ही कार्यालयात भेट दिली तेव्हा मंत्री पालेकर यांना पाहून उपस्थितीत कर्मचारी गोंधळून गेले. फातोर्डा येथील कार्यालयात चार कर्मचारी गैरहजर होते. त्यांनी कोणतेच कारण दिले नव्हते.
रावणफोंड येथे एक कर्मचारी गैरहजर असताना दुसर्‍या एका कर्मचार्‍याने आपल्या अक्षरात गैरहजर कर्मचारी कामावर गेल्याचे लिहिले होते. मंत्री पालेकर यांनी अक्षर तपासले असता त्याचे अक्षर नसल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी संबंधित कर्मचार्‍याला फैलावर घेतले व दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यास कार्यालय प्रमुखांना सांगितले.