जयललितांना शिक्षेच्या  धक्क्याने १६ जणांचा मृत्यू

0
108

अण्णाद्र्रमुकच्या सर्वेसर्वा व तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांना चार वर्षांची शिक्षा सुनावल्याचे सहन न झाल्यामुळे शनिवारपासून १६ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. निवाड्यानंतर केरोसीन ओतून स्वत:स जाळून घेतलेल्या ६५ वर्षीय वेंकटेशन यांचे काल इस्पितळात निधन झाले. अन्य तिघांनी गळफास लावून घेतले. एकाने धावत्या बससमोर उडी टाकून आत्महत्या केली. दोन बारावीच्या विद्यार्थ्यांनीही स्वत:ला आग लावून जीवन संपवले. दहा जणांचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.
दरम्यान, जयललिता यांनी शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका तसेच जामीन अर्ज काल कर्नाटक हायकोर्टात दाखल केला. तसेच तामीळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून पनिरसेल्वम यांचा काल शपथविधी झाला.