प्रदेश कॉंग्रेस विधीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील पूरग्रस्तांना सर्व कॉंग्रेस आमदारांचे एका महिन्याचे वेतन मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनी दिली.
जम्मू आणि काश्मीरमधील अनेक गाव पुरामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानातून पूरग्रस्त भागांची पाहणी करून मदत जाहीर केली आहे. राज्यांनीही मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले होते. गोवा सरकारही यासंबंधी लवकरच घोषणा करेल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आपल्या खाजगी विदेश दौर्यावरून आज गोव्यात परततील. त्यानंतरच यासंबंधीचा निर्णय होऊ शकेल. राज्यातील बिगर सरकारी संस्थाही मदत करण्याच्या तयारीत आहेत.