जम्मू-काश्मीरात द्रोन हल्ल्याचा प्रयत्न लष्कराने उधळला

0
86

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून करण्यात आलेला द्रोन हल्ल्याचा प्रयत्न लष्कराकडून उधळण्यात आला. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ मंगळवारी रात्री १० वाजता एक द्रोन घिरट्या घालताना दिसल्यानंतर लष्कराने द्रोनच्या दिशेने गोळीबार केला. यानंतर द्रोन पाकिस्तानी सीमेत परतले. भारतीय सीमेत द्रोन हल्ल्याचा हा सहावा प्रयत्न होता. अरनिया सेक्टरमध्ये १३ जुलै रोजी रात्री हे द्रोन घिरट्या घालत होते. लष्कराला २०० मीटर उंचीवर लाल दिवा चमकताना दिसला.

लष्कराने तात्काळ त्याच्या दिशेने गोळीबार केला, अशी माहिती बीएसएफने दिली. २ जुलैला पाकिस्तानच्या क्वाडकॉप्टरने अरनिया सेक्टरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. लष्कराने गोळीबार केल्यानंतर ते मागे परतले होते.