पुलवामातील चकमकीत तीन दहशतवादी ठार

0
81

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे काल झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाच्या कमांडरसह आणखी दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. दक्षिण काश्मीरमध्ये ही कारवाई करण्यात आली. यावेळी सुरक्षा जवानांनी मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा आणि काही सामग्री जप्त केली आहे. ठार करण्यात आलेल्या लष्कर ए तोयबाच्या कमांडरची ओळख पटली असून त्याचे नाव एजाज ऊर्फ अबु हुरैरा आहे. तर इतर दोन दहशतवादी स्थानिक असल्याची शक्यता आहे. पोलीस, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाला दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर संयुक्त कारवाई करत परिसर सील केला. यावेळी तीन दहशतवादी ठार करण्यात आले. दरम्यान चकमकीनंतर पुलवामा शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.