जम्मू-काश्मीरमध्ये एक जवान शहीद

0
8

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर ग्रेनेड हल्ला केला. त्यात एक जवान शहीद झाला असून, चार जवान जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी जवांनाना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली होती.