जम्मू आणि काश्मीरमध्ये विरोधकांनी पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन नावाची नवी आघाडी स्थापन केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जासंबंधी ‘गुपकार घोषणा’चे भविष्यातील कार्यवाहीची रणनीती आखण्यासाठी काल आपल्या घरी बैठक बोलावली होती. यावेळी ही आघाडी तयारी केली.
या बैठकीनंतर फारुख अब्दुला यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर व लडाखला काढून घेण्यात आलेले सर्व अधिकार परत द्यावेत अशी आघाडीची मागणी आहे. या बैठकीत जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा महबूबा मुफ्ती देखील सहभागी झाल्या होत्या.