कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची गरज

0
76

>> पंतप्रधान मोदींनी घेतली कोरोनाबाबत बैठक

देशात कोरोनाच्या चाचण्या आणि सीरो सर्व्हे आणखी वाढवण्यात यावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुरुवारी केले. देशातील सर्व नागरिकांसाठी तपासणीची सुविधा कमी किमतीत, नियमितपण आणि जलदगतीने उपलब्ध व्हायला हवी, असे पंतप्रधान म्हणाले. माझे सरकार सर्वांसाठी कमी किमतीत लस उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले. भारतीतील लस निर्माण करणार्‍या निर्मात्यांच्या प्रयत्नांची देखील मोदींनी प्रशंसा केली.
करोनावरील संशोधन आणि लस निर्मितीच्या कामातील प्रगतीची समीक्षा करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, नीती आयोगाचे सदस्य, प्रधान वैज्ञानिक सल्लागार, अनेक वरिष्ठ वैज्ञानिक आणि इतर अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधानांनी वैज्ञानिकांच्या संशोधनाबरोबरच पारंपरिक उपचार पद्धतींच्या किती महत्वाचे आहे, यावर देखील जोर दिला.

लस वितरणाची माहिती
लस उपलब्ध झाल्यानंतर लस वितरणाची आरोग्य मंत्रालय काय तयारी करत आहे, याबाबतही पंतप्रधान मोदी यांनी माहिती घेतली. केंद्रीय आरोग्य मंत्रालय देशात लशीची उपलब्धता निर्माण करणे, मोठ्या प्रमाणावर लशीचा साठा करून ठेवण्याचे तंत्र विकसित करणे आणि लशीची योग्य वितरण व्यवस्था तयार करण्याच्या यंत्रणेवर काम करत आहे.