जम्मूमधून संचारबंदी उठवली

0
105

गेल्या सहा दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये संचारबंदी (कलम १४४ ) लागू असून काल ङ्गक्त जम्मूमधून ही संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे. मात्र, राज्याच्या इतर भागात संचारबंदी कायम असणार आहे. दरम्यान, संचारबंदी उठवण्यात आल्याने जम्मूमधील शाळा आणि महाविद्यालये आज सुरू होणार आहेत. जम्मू जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी सुषमा चौहान यांनी जम्मूमधील संचारबंदी आणि जमावबंदी उठवली आहे. तसे आदेशच काढण्यात आले आहे. या आदेशानुसार शनिवार १० ऑगस्टपासून जम्मूतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था सुरू होतील. त्याआधी सकाळी प्रशासनाने जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल केली होती.