अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अर्जुन पुरस्कार विजेत्या डॉ. ओटिलिया मास्कारेन्हस यांच्या जमीन हडप प्रकरणात संशयित आरोपी स्टीव्हन डिसोझा आणि इतरांच्या सुमारे 6.27 कोटी रुपयांच्या तीन मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 78.14 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली.
राज्यातील जमीन बळकाव प्रकरणांमध्ये मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ईडीकडून तपास सुरू आहे. या संदर्भात अनेक तक्रारी नोंद झाल्या असून तपासादरम्यान स्टीव्हन डिसोझा, मोझेस फर्नांडिस, मोहम्मद सुहैल यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मूळ जमीन मालकांची बनावट ओळखपत्रे तयार करून जमिनी बळकावल्याचा आरोप आहे. या संदर्भातील तपास ईडीकडून सुरू असून संबंधित मालमत्तांवर तात्पुरती जप्तीची कारवाई करण्यात आली
आहे.