नगर नियोजन मंडळाच्या (टीसीपी) कालच्या बैठकीत जमीन विभाग बदलासंबंधी कलम १६ ब खाली ३६ नवीन अर्ज विचारात घेण्यात आले असून जमीन विभाग बदलाखाली नवीन व जुने मिळून एकूण १७९ अर्ज विचारात घेण्यात आले आहेत. मंडळाने विचारात घेतलेल्या ९५ टक्के अर्जांचे क्षेत्रफळ ५०० चौरस मीटरच्याखाली आहे, अशी माहिती नगरनियोजन मंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नगरनियोजन खात्याला १६ ब कलमाखाली अर्ज विचारात घेण्यास मुभा दिल्याने टीसीपीच्या बैठकीत जमिनीचे झोन बदलण्याबाबतचे अर्ज मंडळासमोर ठेवण्यात आले आहेत.