जमीन घोटाळा प्रकरणी आणखी एकास अटक

0
12

गोवा पोलिसांच्या एसआयटीने बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडपल्या प्रकरणी बेती मालीम येथील नूर फैझल भाटकर (४१) याला काल अटक केली. म्हापसा येथील जेनिफर कारोस्को व इतरांनी त्यांची हणजूण येथील वडिलोपार्जित जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप केल्याची तक्रार भाटकर याच्याविरोधात दाखल केली आहे. जमिनीचे बनावट दस्तऐवज, बनावट जन्म व मृत्यू दाखले तयार करून सरकारी कार्यालयात सादर करून ही जमीन हडप केल्याची तक्रार आहे. संशयित भाटकर हा एका रिएल इस्टेट कंपनीचा भागीदार आहे. त्याला म्हापसा येथील न्यायालयात शनिवारी हजर केले जाणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.