सखल जमिनीत बेकायदेशीरपणे मातीचा बेकायदा भराव टाकल्यास, तसेच उतार असलेली जमीन कापल्यास दंड ठोठावण्याचा निर्णय नगरनियोजन खात्याने घेतला आहे. बेकायदा भराव टाकल्यास यापुढे १० लाख रुपये दंड ठोठावला जाणार आहे.
यासंबंधीचा आदेश नगर नियोजन खात्याचे मुख्य नगर नियोजक (प्रशासन) जेम्स मॅथ्यू यांना जारी केला आहे. सखल जमिनीत २ हजार मीटरपर्यंत बेकायदा भराव घातल्यास १० लाख रुपये दंड ठोठावला जाणार आहे. त्यापेक्षा जास्त १० हजार चौरस मीटरपर्यंत जमिनीवर भराव घातल्यास २ हजार मीटरपर्यंतसाठी १० लाख आणि त्या वरील प्रती चौरस मीटरसाठी ५०० रुपये दंड आकारला जाईल. उतार असलेली जमीन कापणार्याला २ हजार मीटरपर्यंत १० लाख रुपये दंड आणि त्यापेक्षा जास्त १० हजार मीटरपर्यंत जमीन कापल्यास पहिल्या २ हजार मीटरसाठी १० लाख रुपये आणि पुढील प्रती चौरस मीटरसाठी ५०० रुपये दंड आकारला जाईल, असेही आदेशात म्हटले आहे.