जन धन योजनेची गिनीज बुकमध्ये नोंद

0
155

केंद्र सरकारच्या जन धन योजनेची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गरीब जनतेच्या कल्याणासाठी या योजनेची सुरूवात केली होती. काल गिनीज बुकच्या अधिकार्‍यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे याविषयीचे प्रमाणपत्र प्रदान केले. मोदींनी सुरू केलेल्या जन धन योजनेमुळे ११.५ कोटी नागरिकांनी बँकांमध्ये खाती उघडली आहेत. ही योजना गेल्या वर्षी २८ ऑगस्टला सुरू करण्यात आली होती. येत्या २६ जानेवारी पर्यंत साडेसात कोटी खाती उघडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, केवळ पाच महिन्यांच्या अल्प कालावधीत हा आकडा गाठण्यात सरकारला यश आले आहे. एवढ्या कमी वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात खाती उघडण्यात आल्याची नोंद गिनीज बुकने घेतली आहे.