जंगली जनावर दुचाकीला धडकल्याने युवक ठार

0
104

>> पिल्लगाळ-कालेतील रात्रीची दुर्घटना

 

काले-पिल्लगाळ येथे सोमवारी रात्री जंगली जनावराने चालत्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात देवगतीमळ-काले येथील उमेश तुकाराम मिसाळ (वय २५) हा युवक ठार झाला. तर दुचाकी चालविणारा त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला. त्याच्यावर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहे.
सविस्तर माहितीनुसार उमेश मिसाळ हा मडगावच्या पॉप्युलर हायस्कुलात ग्रंथपाल म्हणून कामाला होता. तेथून घरी परतत असताना काले येथील शेवटच्या बसने येत असे. तेथून त्याला भाऊ निलेश मिसाळ दुचाकीने घरी घेवून येत असे. सोमवारी दोघे भाऊ कालेहून देवगतीमळ येथे दुचाकीने आपल्या घरी येण्यास परतत होते. पण घरापासून हाकेच्या अंतरावर पोहचले असता जंगली जनावराची जोरदार धडक दुचाकीला बसताच उमेश रस्त्यावर ङ्गेकला गेला. तर निलेश रस्त्यावरच विव्हळत पडला होता.
हे दृष्य रस्त्यातून जाणार्‍याला दिसताच त्याने त्यांच्या घरी व गावात इतरांना कळविताच निलेशला तातडीने उपचारासाठी सांगे उपआरोग्य केंद्र तेथून हॉस्पिसियो व त्यानंतर गोमेकॉत दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत उमेश घरी परतला नाही. म्हणून त्याचा शोध घेण्यात आला. अपघातावेळी दुचाकीची दिशा काले गावाच्या दिशेने होती. त्यामुळे अपघात कालेला जात असतानाच घडला असे दिसत होते. दुचाकीला धडक बसताच उमेश रस्त्याच्या बाजूला झुडपात ङ्गेकला गेला. गावचे लोक त्याचा शोध घेण्यासाठी अपघातस्थळी येवून शोधाशोध केली असता मृतावस्थेत उमेश सापडला. ङ्गसांबरफ या जनावराने धडक दिल्याचा अंदाज लोक वर्तवितात.
मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी गोमेकॉत पाठवून देण्यात आला.