छाननीअंती २५४ उमेदवारांचे अर्ज वैध

0
103

अंतिम उमेदवार संख्या आज स्पष्ट होणार
राज्यातील जिल्हा पंचायतच्या एकूण ५० मतदारसंघांसाठी सादर केलेल्या ३२६ उमेदवारी अर्जांपैकी काल झालेल्या छाननीनंतर एकूण २५४ उमेदवारी अर्ज राहिले आहेत. त्यापैकी १२१ उत्तरेतील तर १३३ दक्षिणेतील उमेदवारांच्या अर्जांचा समावेश आहे. आज दि. ९ हा अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यामुळे दि. १८ रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष किती उमेदवार निवडणूक रिंगणात असतील याचे चित्र आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.बंडखोरीच्या प्रमाणात वाढ
जिल्हा पंचायतीच्या निवडणुका प्रथमच पक्षीय पातळीवर होत आहेत. त्यामुळे बंडखोरीचे प्रमाण बरेच वाढले आहे. एकाच पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे प्रकार घडल्याने या निवडणुकीसाठी नवा वाद तयार झाला आहे. पक्षाचे नेते काही उमेदवारांची मते वळविण्याच्या प्रयत्नात आहेत. कॉंग्रेसने भाजप सरकारच्या पक्षीय पातळीवर जिल्हा पंचायतीच्या निवडणुका लढविण्याच्या निर्णयास विरोध करून त्यांनी भाजप वगळता अन्य कार्यक्षम उमेदवारालाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांनी घरोनघर भेटी देऊन प्रचार कार्य सुरू केले आहे. या निवडणुकीत भाजप, मगो व अपक्ष यांची युती आहे.