छत्तीसगढमध्ये चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा

0
7

छत्तीसगड-तेलंगण सीमेवर ग्रेहाऊंड्स फोर्सने एका महिला नक्षलवाद्यांसह 7 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. जवानांनी घटनास्थळावरून ए-47 आणि इतर शस्त्रेही जप्त केली आहेत. सकाळपासून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील इटुनगरम पोलिस स्टेशन परिसरातील आहे. चकमकीनंतर सुरक्षा दलांनी सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे. नक्षलवादी काही मोठे गुन्हे घडवून आणण्याच्या योजना आखत होते, परंतु जवानांनी त्यांना चकमकीत ठार केले. या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील बस्तरला जाणार आहेत. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी बाहेर काढले आहेत.चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी बाहेर काढले आहेत. तसेच ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. यामध्ये तेलंगणा राज्य समिती सदस्य, विभागीय समिती सदस्य, क्षेत्र समिती सदस्य आणि 2 पक्ष सदस्यांचा समावेश आहे. सुरक्षा दलांनी सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या वर्षात राज्यात 207 हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. बस्तर येथे ऑलिम्पिक क्रीडा कार्यक्रमाच्या समारोप समारंभाला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय नक्षलवाद संपवण्याच्या रणनीतीबाबत अमित शहा प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.