चोवीस तासांत राज्यात 120 नवे कोरोना रुग्ण

0
9

>> एकूण सक्रिय रुग्णसंख्या 818

राज्यात चोवीस तासांत नवीन 120 बाधित आढळून आले असून 7 बाधितांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रूग्णसंख्या 818 एवढी झाली आहे. राज्यातील नवीन कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण 12.9 टक्के एवढे आहे

चोवीस तासात नवीन 927 स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. चोवीस तासांत 8 बाधितांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर, 97 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

राज्यात मार्च महिन्यानंतर आता एप्रिल महिन्यात कोरोनाबाधितांच्या नवीन रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. एप्रिल महिन्यातील पाच दिवसांत एकूण 590 बाधित आढळून आले आहेत. या महिन्यात दरदिवशी शंभरपेक्षा जास्त बाधित आढळून येत आहेत. 4 एप्रिल रोजी आत्तापर्यंतचे सर्वाधिक 169 बाधित आढळून आले होते. तर, 3 रोजी 65 बाधित आढळून आले आहेत. या दिवशी स्वॅबच्या नमुन्याच्या चाचणीचे प्रमाण कमी होते. तसेच, या महिन्यात इस्पितळात उपचार्थ दाखल होणाऱ्या कोविडबाधितांची संख्या वाढत आहे.