राज्यात चोवीस तासांत नवीन १५९ कोरोनाबाधित आढळून आले असून ९ कोरोनाबाधितांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरूच असून कोरोना रुग्णांची सक्रिय संख्या १०४० एवढी झाली आहे.
राज्यातील कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण १२.२५ टक्के एवढे आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३९५७ एवढी आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन १२९७ जणांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. दरम्यान, चोवीस तासांत आणखी २०० जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात नवीन बाधितांची संख्या वाढत असली तरी बाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०४ टक्के एवढे आहे.