चोवीस तासांत राज्यात कोरोनाने एकाचा मृत्यू

0
34

राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ६० बाधित रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाच्या बळीची नोंद झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६५२ झाली असून कोरोना बळींची एकूण संख्या ३३३३ एवढी झाली आहे. काल बुधवारी ५१ जण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७५ टक्के एवढे आहे. ५१ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. ३ जणांना घरी पाठविण्यात आले. ९ जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत.