>> मंगळवारी ८० नव्या बाधितांची नोंद
राज्यात गेल्या चोवीस तासंात २ बळींची नोंद झाली असून नवे ८० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ८१ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७६ टक्के एवढे आहे. काल मंगळवारी १३ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
सध्या राज्यातील एकूण बळींची संख्या ३३३२ एवढी झाली आहे.
तसेच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६४४ झाली आहे. तर गेल्या चोवीस तासांत राज्यातून आणखी ८१ रुग्ण बरे झाले आहेत.
काल रविवारी इस्पितळातून ७ रुग्णांना घरी पाठविण्यात आले. ६७ जणांनी घरी विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे.
काल रविवारी राज्यात कोरोनासाठी ३५४२ जणांची स्बॅव चाचणी करण्यात आली.
सर्वाधिक रुग्णसंख्या मडगावात
अजूनही राज्यात सर्वात जास्त रुग्ण मडगाव येथे असून तिथे रुग्णसंख्या ६६ एवढी आहे. इतर ठिकाणी ५० पेक्षा कमी रुग्ण आहेत. सध्या पणजीत ४६, चिंबल ४०, कांदोळीत ३७ तर काणकोणात ३१ अशी रुग्णसंख्या आहे.
राज्यात सध्या कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १,७३,२५२ एवढी झाली आहे. तर एकूण कोरोना रुग्णसंख्या १,७७,२२८ एवढी झाली आहे. राज्यात आतापर्यंत १४,०३,९४४ एवढ्या स्वॅब चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत घरी विलगीकरणात राहिलेल्यांची संख्या १,२४,०४० एवढी असून इस्पितळात आतापर्यंत भरती झालेल्यांची संख्या २९,६६९ एवढी आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.