चोवीस तासांत राज्यात कोरोनाने ११५ बाधित

0
50

>> एकाचा मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या ८८४

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत काल मंगळवारी वाढ झाल्याचे दिसून आले. गेल्या चोवीस तासांत राज्यात ११५ बाधित सापडले. तसेच चोवीस तासांत एका व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली. तसेच गेल्या चोवीस तासांत १०३ जण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ८८४ एवढी झाली आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता ३१७७ एवढी आहे. काल राज्यात ५८३९ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,७२,६८३ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६५ टक्क्यांवर पोहोचले आहे.

चोवीस तासांत १०३ कोरोनामुक्त
गेल्या चोवीस तासांत राज्यात १०३ जण बरे झाले आहेत. तर इस्पितळांतून काल ३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,६८,६२२ एवढी झाली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. तसेच काल नव्याने इस्पितळात ११ जणांना भरती करण्यात आले.
काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने १०४ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला.

सध्या राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मडगाव येथे असून त्यांची संख्या ८२ आहे. कासावली ५९, पणजी ६१ अशी रुग्णसंख्या असून इतर ठिकाणी ५० पेक्षा कमी रुग्ण आहेत.

आतापर्यंत इस्पितळात उपचार घेतलेल्यांची संख्या २८,८५६ एवढी असून गृहविलिनीकरणात राहिलेल्यांची संख्या १,२०,३५० एवढी आहे. राज्यात आतापर्यंत ११,३८,७८८ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.